Monday, 17 April 2017

कोट्यवधींचा गाळ

-सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

*****************************

पश्‍चिम उपनगरातील गाळ काढण्यासाठी यंदाही 25 कोटींचा प्रस्ताव समितीच्या मंजुरीसाठी आला आहे. गेल्या बैठकीत तो राखून ठेवला होता. 

पावसाळ्यानंतर नद्या-नाले गाळाने भरल्याने एसएनडीटी नाला, ईर्ला नाला, मालवणी नाला, चंदावरकर नाला, मोगरा नाला, काजूपाडा नाला, वाकोला नदी, मिठी नदी, दहिसर नदी, वालभट नदी, पोयसर नदी आणि ओशिवरा नदीतील गाळ काढण्यात येणार आहे. 

यंदाही कोट्यवधीचा गाळ उपसण्यात येणार आहे.


325 कोटींचे नाले
गेल्या पावसाळ्यात पडझड झाल्याचे कारण देत पश्‍चिम उपनगरातील नाल्यांसाठी तब्बल 325 कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या प्रयत्नाने हा मोठा प्रस्ताव मंजुरीसाठी आल्याची चर्चा आहे. या निधीतून नाल्याची 32 कामे केली जातील. उपनगरातील नाले व मोऱ्यांची सुमारे 30 कोटींचे प्रस्तावही मंजुरीसाठी आहेत.


पूर्ण बातमी -

हजार कोटींचे "निवडणूक पॅकेज'

No comments:

Post a Comment