वालभट नदीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांना उपयोगी पडेल अशी माहिती व सूचना ह्या अनुदिनीवर ( ब्लॉगवर) दिसतील. This blog will provide useful information and suggestions to the volunteers who will contribute in conservation of Walbhat river. खालील प्रतिमा - वालभट नदीचा धबधबा. नागरी निवारा वसाहत, गोरेगाव (पूर्व) , मुंबई. Waterfall on Walbhat River. Near NNP colony, Goregaon (East) , Mumbai.
▼
Monday, 17 April 2017
BMC will head survey to identify PAPs for Brimstowad project
The project, aimed at easing flooding in Mumbai during monsoons, has been delayed due to slum encroachments along the Dahisar, Poisar, Oshiwara and Mithi rivers as well as the Vakola nullah.
कोट्यवधींचा गाळ
-सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016
*****************************
पश्चिम उपनगरातील गाळ काढण्यासाठी यंदाही 25 कोटींचा प्रस्ताव समितीच्या मंजुरीसाठी आला आहे. गेल्या बैठकीत तो राखून ठेवला होता.
पावसाळ्यानंतर नद्या-नाले गाळाने भरल्याने एसएनडीटी नाला, ईर्ला नाला, मालवणी नाला, चंदावरकर नाला, मोगरा नाला, काजूपाडा नाला, वाकोला नदी, मिठी नदी, दहिसर नदी, वालभट नदी, पोयसर नदी आणि ओशिवरा नदीतील गाळ काढण्यात येणार आहे.
यंदाही कोट्यवधीचा गाळ उपसण्यात येणार आहे.
325 कोटींचे नाले
गेल्या पावसाळ्यात पडझड झाल्याचे कारण देत पश्चिम उपनगरातील नाल्यांसाठी तब्बल 325 कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या प्रयत्नाने हा मोठा प्रस्ताव मंजुरीसाठी आल्याची चर्चा आहे. या निधीतून नाल्याची 32 कामे केली जातील. उपनगरातील नाले व मोऱ्यांची सुमारे 30 कोटींचे प्रस्तावही मंजुरीसाठी आहेत.
पूर्ण बातमी -
हजार कोटींचे "निवडणूक पॅकेज'
अतिक्रमणांनी अडवले ‘ब्रिमस्टोवॅड‘
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जुलै 2016
************************
************************
मिठीसह अन्य लहान-मोठ्या नदी-नाल्यांची पावसाचे पाणी वाहून नेण्याची, तसेच समुद्रातील भरतीच्या पाण्याची साठवण क्षमता वाढवली असली तरी आजही नागरिकांच्या मनातील मिठीचा धाक कायम आहे.
"ब्रिमस्टोवॅड‘ प्रकल्पातील कामांमुळे 50 मिलिमीटर पावसाचे पाणी नदी-नाल्यांतून वाहून जाऊ शकते.
साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पाच "पम्पिंग स्टेशन्स‘ सुरू झाली असून, तीन प्रगतिपथावर आहेत. एरवी दोन-दोन दिवस साचून राहणाऱ्या पुराच्या पाण्याचा यंदा दोन-तीन तासांत निचरा झाला.
नालेसफाई आणि रुंदीकरण-खोलीकरणाच्या कामांत महापालिकेला चुना लावणाऱ्या कंत्राटदार आणि अभियंत्यांना आयुक्तांनी कारवाईचा दणका दिला.
तथापि, नद्या-नाल्यांलगतच्या अतिक्रमणांनी "ब्रिमस्टोवॅड‘ अडवल्याने 26 जुलैचा धोका पूर्णत: संपलेला नाही.

मिठी नदीच्या महापुराला तब्बल 11 वर्षे झाली. अजूनही त्याच्या आठवणींनी मुंबईचे नागरिक अस्वस्थ होतात. गेल्या वर्षी सुमारे 450 साडेचारशे मिलिमीटर पाऊस झाला आणि "26 जुलै‘ची भीती जागी झाली.
त्या जलप्रलयाच्या वेळी तब्बल 944 मिलिमीटर पाऊस झाला होता.
गेल्या वर्षी मिठी नदी पातळी ओलांडण्यासाठी फक्त एक मीटरने कमी पडली होती. त्या तुलनेत यंदा पाऊस कमी आहे. "मिठी‘ची दहशत कमी झाली असली तरी धाक कायम आहे.